Konkan Railway: कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. या काळात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा ताण मोठया प्रमाणात वाढतो. योग्य आणि वेळेत नियोजन केल्यास प्रवाशांची गैरसोय कमी होऊन त्यांचा प्रवास सुखकर बनू शकतो. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी कोकण विकास समितीने अभ्यास करून काही बदल आणि उपाययोजना रेल्वे प्रशासनास सुचवल्या आहेत. त्या आशयाचे निवेदन त्यांनी रेल्वे बोर्ड तसेच इतर संबंधित आस्थापानांना पाठवले आहे.
निवेदनात कोणत्या गोष्टी सुचवल्या आहेत?
गणेशोत्सवात दिवा रोहा मेमू चिपळूणपर्यंत वाढवल्याने 2022, 2023 आणि 2024 मध्ये रोहा येथे प्रवासी आंदोलन, रेल रोको आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे दिवा रोहा मेमूचा विस्तार करण्याऐवजी किंवा पनवेल ते चिपळूण दरम्यान वेगळी स्पेशल ट्रेन चालविण्या ऐवजी मुंबई सीएसएमटी ते चिपळूण दरम्यान अनारक्षित गाड्या चालवाव्यात. या गाडयांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबे देण्यात यावेत. तसेच या गाडयांना द्वितीय श्रेणी (2S) आणि AC चेअर कार (CC) कोच सोयीचे पडतील. पनवेल स्थानक बहुतेक प्रवाशांना सोयीचे नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या किमान दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत चालवणे गरजेचे आहे.
चिपळूण – रत्नागिरी दरम्यानच्या दिवसा धावणाऱ्या गाड्यांसाठी सेकंड स्लीपर SL किंवा थ्री टायर एसी 3A डब्यांचे रूपांतर सेकंड सीटिंग 2S आणि एसी चेअर कार CC कोच मध्ये केल्यास जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. (See below table)
CLASS |
LHB |
IRS/ICF |
Second Class Seating (2S) |
120 (1.5 times of 80 berths in SL) |
108 (1.5 times of 72 berths SL) |
Sleeper used as 2S |
100 (1.25 times of 80 berths in SL) |
90 (1.25 times of 72 berths in SL) |
AC Chair Car (CC) |
78 |
74 |
3A used as CC |
90 (1.25 times of 72 berths in 3A) |
80 (1.25 times of 64 berths in 3A) |
3E used as CC |
100 (1.25 times of 80 berths in 3E) |
– |
अतिरिक्त रेकचा वापर: दिवा पेण मेमूच्या अतिरिक्त रेकचा उपयोग शनिवार व रविवार रोजी मुंबई/ठाणे ते खेड दरम्यान विशेष ट्रेन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच, 10101/10102 रत्नागिरी मडगाव एक्स्प्रेस, 17613/17614 नांदेड पनवेल एक्स्प्रेसचा रेक मुंबई ते वीर/खेड/चिपळूण/रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्या चालविण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
पनवेल ऐवजी दिवा किंवा एलटीटी वरून विशेष गाड्या चालवणे: मुंबई विभागातील एकाच बोर्डिंग/डिबोर्डिंग स्टेशनमुळे पनवेल येथून सुटणाऱ्या गाडयांना प्रतिसाद कमी मिळतो (low occupancy ). तसेच, पनवेल हे बहुतांश मुंबई विभागासाठी सोयीचे नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने दिवा किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या विशेष गाड्या चालवण्याचा विचार करावा.
या स्थानकांवर थांबे द्या: पेण, करंजाडी, सापे वामणे, विन्हेरे, दिवाणखावटी, रावली, खारेपाटण रोड, आचिर्णे, सौंदळ, झाराप, मडुरे, पेरणेम, इ. या स्थानकांवर नियमित प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त, दररोज किमान दोन विशेष गाड्या (एक मध्य रेल्वे आणि एक पश्चिम रेल्वे) साठी थांबे द्या.
मालवाहतूक आणि रोरो सेवांना स्थगिती: प्रवासी गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी सणासुदीच्या काळात माल आणि RORO (रोल-ऑन रोल-ऑफ) वाहतूक तात्पुरती स्थगित ठेवण्याचा विचार करावा.
पश्चिम रेल्वेचे योगदान: सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, वलसाड, वडोदरा, उधना, सुरत, विश्वामित्री, अहमदाबाद, पुणे, मनमाड, भुवावळ, नागपूर, अशा विविध टर्मिनल्सवरून गाड्या चालवणे आवश्यक आहे. ठाणे, कल्याण आणि वसई रोडसारख्या महत्त्वाच्या मध्यवर्ती स्थानकांवर दररोज पुरेशा गाड्या उपलब्ध करून देणे. वसई रोडवर लोको रिव्हर्सल टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई प्रदेशातून कोकण रेल्वेपर्यंत अमृत भारत, मेमू किंवा वंदे भारत गाड्या चालविल्यास फायदा होईल.
FTR सेवेस वेळेचे बंधन देण्यात यावेत: FTR स्पेशल सेवेमुळे सामान्य तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे UTS आणि PRS द्वारे बुकिंगसाठी खुल्या असलेल्या सामान्य विशेष गाड्यांसाठी प्राइम स्लॉट आरक्षित केले जावेत आणि FTR स्पेशल सेवा फक्त 11:00 ते 16:00 या वेळेत मुंबईपासून चालवल्या जाव्यात.
पूर्णत: अनारक्षित स्पेशल गाड्या फक्त जास्त मागणी असलेल्या दिवसांपुरती मर्यादित ठेवा: पूर्णत: अनारक्षित स्पेशल फक्त गर्दीच्या दिवसांमध्ये चालवल्या जाव्यात किंवा त्या गाड्यांमध्ये काही आरक्षित डबे दिले जावेत.
12 कोच मेमूऐवजी 22/24 कोच ट्रेन चालवा: 12 कोच MEMU चालवल्याने मार्ग ब्लॉक होतो परंतु कमी प्रवासीक्षमता प्रदान करते. त्यामुळे, मार्गाच्या जास्तीत जास्त वापरासाठी 22 LHB/24 IRS कोच असलेल्या गाड्या चालवणे आवश्यक आहे.
खालील टेबल मध्ये दर्शविलेल्या गाडयांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान ३ स्थानकांवर अतिरिक्त तात्पुरते थांबे प्रदान करा उदा. माणगाव, वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे.
22653/22654 NZM TVC Express |
22655/22656 NZM ERS Express |
22660/22659 KCVL YNRK Express |
12217/12218 Kerala Sampark Kranti Express |
22910/22909 PBR KCVL Express |
19577/19578 JAM TEN Express |
12284/12283 Duronto Express |
20924/20923 Humsafar Express |
12201/12202 Garib Rath Express |
12223/12224 Duronto Express |
Facebook Comments Box
Vision Abroad