Nagpur Goa Shaktipeeth Highway Updates:नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या ८०२ किमीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आले आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभेतील पराभवानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर या प्रकल्पाबाबतन निर्णय घेईल असे ठरविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
“या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. किमान पुढील ३-४ महिने जमीन संपादित करू नयेत असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (ऑक्टोबरमध्ये) नवीन सरकार या प्रकल्पाचे भवितव्य ठरवेल”, असे या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या कामामुळे शेतकरी वर्गासह कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याला विरोध आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रोखणे आवश्यक असून या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १२ जिल्हे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून या १२ जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी असे तब्बल २०० लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad