Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12202 / 12201 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Kochuveli Garib Rath Express ही गाडी उद्या दिनांक २३ जूनपासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एलटीटी मुंबई ते कोचुवेली या मार्गावर धावताना गाडी क्रमांक (12202) दिनांक 23 जून 2024 च्या फेरीपासून तर कोचुवेली ते एलटीटी मुंबई या मार्गावर धावताना गाडी क्रमांक (12201) दिनांक 24 जून 2024 च्या फेरीपासून या नवीन बदलासह चालवण्यात येणार आहे.
डब्यांच्या संख्येत वाढ
या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला असून डब्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ही गाडी थ्री टायर एसी – 11, एसी चेअर कार – 02 आणि जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण १५ डब्यांची चालविण्यात येत होती. आता त्यात बदल करून थ्री टायर इकॉनॉमी एसी – 16, एसी चेअर कार – 02 आणि जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण 21 एलएचबी डब्यांची चालविण्यात येणार आहे.
Facebook Comments Box