Konkan Railway News: या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा या वर्षीच्या ऑक्टोबर अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ स्लीपर डबे असलेली ही गाडी यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना फायद्याची ठरणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीची सेवा दिनांक ३१ ओक्टोम्बर २०२४ पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. या गाडीची सेवा दिनांक जून अखेरपर्यंत समाप्त होणार होती. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या गाडीचा ओक्टोम्बर अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad