कोकण रेल्वे सांतरण हॉल्ट ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले असल्याचे उत्तर एका निवेदनाला उत्तर देताना कोकण रेल्वेने सांगितले आहे.
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्रमांक 01139/40 नागपूर मडगाव या विशेष द्विसाप्ताहिक गाडीला कोकण रेल्वे मार्गावर दिलेल्या थांब्याव्यतिरिक्त अन्य स्थानकांवर थांबे देण्यास असमर्थता दर्शविली आहे. ही गाडी कायमस्वरूपी करावी तसेच वाढीव थांबे मिळावेत अशी मागणी कोकण रेल्वेकडे आली होती. मात्र या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
खान्देश, विदर्भ व कोकणाला जोडणाऱ्या या विशेष गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र या गाडीला अतिरिक्त थांबे देवून ती कायमस्वरूपी करावी अशी मागणी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना, शेगांव यांनी देशाचे विद्यमान पंतप्रधान, केंदीय रेल्वे मंत्री, कोकण रेल्वे, रेल्वे बोर्ड तसेच संबधित लोकप्रतिनिधींना पोस्टल निवेदनातून केली होती. कोकण रेल्वे मार्गावरील वीर, आडवली, विलवडे, वैभववाडी रोड, नांदगाव, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी टर्मिनस येथे थांबेही देण्याची मागणी या निवेदनात केली होती. या निवेदनाचे उत्तर कोकण रेल्वेने दिले असून त्यात या गाडीची मुदतवाढ करणे, कायमस्वरूपी करणे किंवा थांबे देणे हे सर्व मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डच्या अधिकार कक्षेत येत असल्याचे सांगून कोकण रेल्वेने हात वर केले आहेत.
कोकण रेल्वे ‘Staggering Halt’ या धोरणाचा अवलंब करत असून या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ दर्जा राखून ठेवण्यासाठी या गाड्यांना स्थानकांवर आलटून पालटून काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. आपण विनंती केलेल्या स्थानकात गरजेप्रमाणे थांबे या आधीच देण्यात आले आहेत. तसेच गणेश चतुर्थी, होळी आणि इतर हंगामात चालविण्यात येणाऱ्या विशेष गाडयांना या स्थानकांवर थांबे देत येत असल्याचेही या उत्तरात कोकण रेल्वेने नमूद केले आहे.
सावंतवाडीचा थांबा अजूनही पूर्ववत नाही.
या गाडीला सावंतवाडी स्थानकावर पूर्वी थांबा होता. मात्र या गाडीला प्रवासीसंख्या Footfall जास्त असुनही या गाडीचा थांबा काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टीने ही गाडी महत्वाची मानली जात आहे. कारण विदर्भातील आणि खान्देशातील पर्यटक या गाडीने कोकणात उतरत आहे. सावंतवाडी तालुका येथील लाकडी खेळण्यांसाठी तसेच रेडी, आंबोली या सारख्या पर्यटनस्थळांसाठी प्रसिद्ध मानला जात असताना या गाडीला सावंतवाडी स्थानकावर थांबा असणे गरजेचे आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad