सिंधुदुर्ग:पावसाळ्यात आंबोली घाट प्रवासासाठी खूपच धोकादायक बनतो, अनेकदा सुरक्षिततेसाठी अवजड वाहतूक बंद करावी लागते. त्यामुळे आंबोली घाटातील मार्गाला पर्यायी मार्ग असावा ही मागणी होत होती. आता या मार्गाला पर्यायी मार्ग मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली
महाराष्ट्र, कर्नाटक , गोवा असा तीन राज्यांना जोडणारा आंबोली घाटमार्गाला पर्यायी मार्ग केसरी, फणसवडे, नेनेवाडी ,चौकुळ, आंबोली, अशा कमी अंतराच्या मार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये 70 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून मंजुरीही देण्यात आली आहे. जिल्हा मार्ग क्रमांक 60 असे या मार्गाचे नाव असून 9.2 किमी अंतराच्या या मार्गासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे .त्यामुळे गेली कित्येक वर्ष प्रतीक्षेत असलेला हा पर्यायी मार्ग आता होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा पर्यायी मार्ग अखेर मार्गी लागला आहे. अशी माहिती भाजपचे युवा नेते तथा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेत आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थसंकल्प बजेट मांडण्यात आले.या अर्थसंकल्पामध्ये केसरी फणसवडे ते नेनेवाडी असा 9.2 किमीच्या मार्गाला 60 कोटी रुपयांची तरतूद करून निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तर या मार्गामध्ये वनखाते अथवा इतर आरक्षित जागे संदर्भात दहा कोटी रुपये असे एकूण 70 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. हा पर्यायी घाट मार्ग व्हावा यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून अनेक लोकांची मागणी होती. मात्र, या मागणीला आज खऱ्या अर्थाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सत्यात उतरवले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad