Mumbai Goa Highway | आजपासून तीन दिवस मुंबई गोवा महामार्गावर ब्लॉक, पर्यायी मार्ग कोणते?

   Follow us on        
Mumbai-Goa highway Block: कोकणकरांसाठी एक मह्त्वाची बातमी आहे. आजपासून मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवसांचा (११ जुलै-१३ जुलै) ब्लॉक घेतला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे.महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक सकाळी ६-८ वा. आणि दुपारी २-४ वा. अशा दोन टप्प्यात असणार आहे. वाहतूक विभाग अप्पर महासंचालकांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लावली जाणार आहे. याच कामाचा भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या पुलाच्या कामादरम्यान वाहतूक बंद ठेवणे गरजेचे असल्याने मुंबई – गोवा महामार्गावर तीन दिवस चार तासांचे ब्लॉक घेण्यात आला आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे. वाहतूक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.
मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– वाकण फाटा येथून भिसे खिंड-रोहा- कालाड मार्गे.
– वाकण फाटा येथून पाली-रवाळजे-कोलाड मार्गे किंवा पाली-रवाळजे- निजामपुर-माणगांव मार्गे.
– खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे.
गोव्याहून मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग
– कोलाड येथून कालाड-रोहा-भिसे खिंड- वाकण फाटा मार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली वरून वळवून वाकण- पाली- खोपोली राष्ट्रीय महामार्गे
– कोलाड येथून रवाळजे-पाली-वाकण फाटा वरून वळवून मुंबई गोवा महामार्गे
महत्त्वाचे म्हणजे, हा ब्लॉक तीन दिवसांत अवघ्या चार तासांसाठी असेल. इतर वेळेत मुंबई- गोवा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search