KR updates: कोकण रेल्वेच्या सामान्य प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी रेल्वे कडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सामान्य General डब्यांत होणारी जीवघेणी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या एका गाडीच्या जनरल डब्यांत वाढ केली आहे. रेल्वेने दिनांक १२ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार.
गाडी क्रमांक १६३३७/१६३३८ ओखा – एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस या गाडीच्या दोन थ्री-टायर एसी डबे सामान्य कोच मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. या आधी ही गाडी २ जनरल डब्यांसहित चालवली जात होती ती १५ नोव्हेंबर पासून ४ जनरल डब्यांसहित चालवली जाणार आहे.
Coach Discriptions | Existing | Revised |
Second Sleeper | 12 | 12 |
Two Tier AC | 2 | 2 |
Three Tier AC | 3 | 1 |
Pantry Car | 1 | 1 |
Generator Van | 1 | 1 |
SLR | 1 | 1 |
General | 2 | 4 |
Total | 22 | 22 |
Konkan Railway | सामान्य प्रवाशांना दिलासा, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या गाडीच्या जनरल डब्यांत वाढ… – Kokanai https://t.co/A5o44c9dSK#konkanrailway pic.twitter.com/wbR6JBPRBk
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) July 13, 2024
Facebook Comments Box