रत्नागिरी, १४ जुलै, १८:३० | कोकण रेल्वेच्या वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भूस्खलन झाल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसपंर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिली आहे. या व्यत्ययामुळे गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्स्प्रेस रोहा स्थानकावर थांबवून ठेवण्यात आली आहे. तर गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस दिवाणखवटी येथे अडकली आहे. मडगाव – सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकावर थांबविण्यात आली आहे.
हा अडथळा दूर करून लवकरच वाहतूक चालू करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ अपेक्षित आहेत.
अधिक माहिती प्रतिक्षीत आहे………..
Facebook Comments Box
Vision Abroad