Landslide on Railway Track:कोकण रेल्वेच्या वीर-चिपळूण विभागातील करंजाडी-विन्हेरे स्थानकादरम्यान रेल्वेमार्गावर आज संध्याकाळी ५ च्या सुमारास भूस्खलन झाल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मार्ग बंद झाल्याने काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार
आज दिनांक १४ जुलै २०२४ ला सुटणारी गाडी क्रमांक २०१११ कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार सहा तास उशिराने म्हणजे पहाटे ५ वाजता सोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी खडकी स्थानकावरून पुणे- लोणावळा- मिरज मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस रोहा स्थानकावरून मागे फिरवून पुणे- लोणावळा- मिरज मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक १२७४२ वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस जाते स्थानकावरून मागे फिरवून पुणे- लोणावळा- मिरज मार्गे वळविण्यात आली आहे.
आज सुटणारी 50103 – दिवा – रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पूर्णतः रद्द करण्यात आली आहे.
लांब पल्ल्याच्या गाड्या मागे फिरवून त्या पर्यायी मार्गाने वाळविल्याने या गाडीतून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्र्रातील प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Latest and Important Updates : मध्य रेल्वे प्रशासनाने आताच केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक २२१५० पुणे – एर्नाकुलम, १२६१९ मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक १२७४२ वास्को-दा-गामा सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचे डायव्हर्जन रद्द करण्यात आले आहे. या गाड्या पर्यायी मार्गाने न चालविता आपल्या नियमित मार्गाप्रमाणे चालविण्यात येणार आहेत याची प्रवाशांनी नोंद घ्यावी.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: बाप्पा आता तूच वाचव! महामार्गावर १०६ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे
कोकण
नागपूर - सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसचा २० डब्यांचा रेक मुंबई - मडगाव वंदेभारत एक्सप्रेससाठी वापरण्...
कोकण
खुशखबर! पश्चिम रेल्वेची गणपती विशेष गाड्यांची यादी तयार; कोकण,मध्य आणि दक्षिण रेल्वेकडून प्रस्ताव मं...
कोकण रेल्वे