परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनससाठी राबवलेल्या “हर घर टर्मिनस” मोहिमेला कोकणवासियांचा अभूतपूर्व प्रतिसाद

आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले– फेसबुक वरील रील मोठ्याप्रमाणात व्हायरल –व्हाट्सअँप ग्रुप एका दिवसात फुल्ल
   Follow us on        
सावंतवाडी:दि. १४ जुलै: कोकण रेल्वे येण्यासाठी कोणताही विरोध न करता आपल्या जमिनी या प्रकल्पाला देणाऱ्या कोकणकरांच्या हाती दोन ते तीन गाड्या सोडल्या तर काही लागले नाही. अनेकवर्षे प्रवासी संघटनेने केलेल्या वसई-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी, बोरिवली/सावंतवाडी या मार्गावर गाड्यांच्या केलेल्या मागण्या अपूर्ण आहेत. या गाड्या चालविण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण होणे महत्वाचे आहे. होळी- गणेशचतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येतात. मात्र सावंतवाडी टर्मिनस च्या अपूर्ण कामामुळे त्या गाड्या दक्षिणेकडील राज्यात पाठवल्या जातात आणि ज्यांच्यासाठी या गाड्या सोडल्या त्यांनाच रेल्वे आरक्षणापासून वंचित राहावे लागते. चार दिवसांपूर्वी पेडणे येथील बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे कोकणरेल्वे पूर्णपणे विस्कळीत झाली होती. या घटनेने मागील ९ वर्षे विनाकारण रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसची गरज पुन्हा एकदा जाणवली आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी या संघटनेद्वारे कोकणकर पुन्हा एकदा या प्रश्नावरून आक्रमक झाला. सावंतवाडी टर्मिनस च्या रखडल्या कामाविरोधात  आणि अन्य प्रश्नांसाठी संघटनेने  “हर घर टर्मिनस” ही मोहीम राबवली असून मागील दोन दिवसांत समस्त कोकणकरांचा या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
हर घर टर्मिनस मेल मोहिम
संघटनेने “हर घर टर्मिनस मेल मोहिम ” राबवली असून समस्त कोकणवासीयांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी संवैधानिक हक्कासाठी,  भुमीपुत्रांच्या विकासासाठी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत तत्काळ विलीनीकरण व्हावे, सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे, फक्त व फक्त कोकणासाठी नवीन गाड्या किंवा वाढीव थांबे मिळावे या आपल्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासन, केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवायचे आहेत.  सोबत मेलचा मायना दिला आहे तो आपल्या ईमेल ने सन्माननीय रेल्वे मंत्री, रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड, रेल्वे विभाग व कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत हजारोंच्या संख्येने ईमेल सर्व बांधव, भगिनी, कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, समाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरातून सर्वानी वैयक्तिक पाठवायचे आहेत. फक्त एका टिचकीवर किंवा वरील QR Code द्वारे हे निवेदन आपल्या जिमेल मध्ये उघडेल तेथून फक्त आपल्याला सेंड बटन दाबून पाठवायचे आहे असे आवाहन संघटनेद्वारे करण्यात आले आहे.
या मोहिमेत आतापर्यंत २००० पेक्षा जास्त संख्यने ई-मेल पाठवले गेले असून या मोहिमेस खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याची संघटनेतर्फे श्री. सागर तळवडेकर यांनी दिली आहे.
‘ती’ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल 

सावंतवाडी टर्मिनसच्या सुशोभणीकरणादरम्यान प्रवशेद्वारावर लावण्यात आलेल्या “सावंतवाडी रोड” फलकाच्या निषेधार्थ फलकाच्या समोरच संघटनेतर्फे नाराजीचे फलक लावण्यात आले आहेत. या संबंधित पोस्ट केलेली एक रील समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत ७ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूव्स Views आले तर हजारो कोकणकरांनी तिला लाईक केले आहे. संघटनेतर्फे बनविण्यात आलेल्या व्हाट्सअँपग्रुपला पण खूप मोठा प्रतिसाद लाभत असून फक्त एक दिवसात ग्रुप फुल्ल झाला आहे. तर अन्य ग्रुप ची लिंक या बातमीत खाली दिली आहे.

Loading

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search