रत्नागिरी दि.१६ जुलै: दिवाणखवटी जवळ रेल्वे मार्गावरील आलेला मोठा अडथळा बाजूला केला असून रेल्वे मार्गावरील वाहतूक काल संध्याकाळी चालू करण्यात आली आहे. मात्र संपूर्ण वाहतूक पूर्वपदावर येण्यास अजूनही काही अवधी लागेल. आज दिनांक १६ जुलै रोजी काही गाड्या आपले वेळापत्रक सोडून चालत असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने आज जाहीर केलेल्या माहितीनुसार खालील गाड्या रद्द, पुनर्नियोजित आणि उशिराने चालविण्यात येत आहेत.
पूर्णतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
आज दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु जाणाऱ्या खालील गाड्या पूर्णतः रद्द काण्यात आल्या आहेत.
- गाडी क्र. २०११२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकण कन्या” एक्सप्रेस
- गाडी क्र. ११००४ सावंतवाडी रोड – दादर – “तुतारी” एक्स्प्रेस
- गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर .
- गाडी क्र. १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेस
- गाडी क्र. २२२३० मडगाव जं. – सीएसएमटी “वंदे भारत” एक्सप्रेस
- गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – सीएसएमटी एक्सप्रेस
दिनांक १७ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
दिनांक १८ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.
पुर्ननियोजीत Reschedule करण्यात करण्यात आलेल्या गाड्या
- दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११ श्री गंगानगर – कोचुवेली एक्स्प्रेस दिनांक १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजता श्रीगंगानगर या स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “तेजस” एक्स्प्रेस दिनांक १६ जुलै रोजी सकाळी 9 वाजता या सीएसएमटी स्थानकावरून प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १६ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस तिरुनेलवेलीवरून आज सकाळी ०७:३५ वाजता प्रस्थान करणार आहे.
- दिनांक १५ जुलै रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १८०४७ शालीमार – वास्को दा गामा एक्सप्रेस शालिमार येथून आज सकाळी ( दिनांक १६ जुलै रोजी) ०५:३० वाजता प्रस्थान करणार आहे.
उशिराने धावत असलेल्या गाड्या
- दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – एच. निजामुद्दीन एक्स्प्रेस २४० मिनिटे उशिराने धावत आहे.
- दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनेलवेली – जामनगर एक्सप्रेस ७४५ मिनिटे उशिराने धावत आहे.
- दिनांक १५/०७/२०२४ रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११४ कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस प्रवास 845 मिनिटे उशिराने धावत आहे
Facebook Comments Box
Related posts:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार? – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यां...
महाराष्ट्र
कोकण रेल्वे बेळगावला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू; बेळगाव,चंदगड,आंबोलीसह एकूण 9 स्थानकांची निश्चिती
महाराष्ट्र
संकेश्वर- बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातूनच बांद्याकडे जाणार; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्या...
कोकण
Vision Abroad