सावंतवाडी, दि. १७ जुलै: : आंबोलीत काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दरम्यान आज (दि.17) सकाळी आंबोली घाटमार्गात दरडीतील भला मोठा दगड कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणालाही हानी झाली नाही. ही घटना सकाळी ७ च्या सुमारास घडली. .या घटनेमुळे सद्या घाटमार्गातून एकेरी वाहतूक सुरू आहे. तर दगड कोसळलेल्या ठिकाणी लहान – मोठे धबधबे असून नेहमी तेथे पर्यटकांची रेलचेल असते. त्यावेळी अशी घटना घडली असती तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, मात्र, सकाळी ७ वा. सुमारास सदर घटना घडल्याने कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. तर भला मोठा दरडीतील दगड थेट घाटमार्गात कोसळल्याने रस्त्याला मोठा खड्डा पडत भेग पडली आहे. त्यामुळे रस्ता खचण्याची शक्यता आहे.
वाहन चालकांनी याबाबतची माहिती आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई यांना दिली. त्यानंतर त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सध्या जेसीबीच्या सहाय्याने हा दगड हटविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेवेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. सद्यस्थितित या भागातून एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती दत्तात्रय देसाई यांनी दिली आहे.
Facebook Comments Box