कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा : श्री.यशवंत जडयार*
Follow us onमुंबई दि. २० जुलै:अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची एल्गार सभा रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वा. सोशल सरव्हिसलिग हायस्कूल दामोदर हॉलच्या बाजूला परळ मुंबई येथे समिती अध्यक्ष श्री.शेखर बागवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
समितीच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांपासून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे, रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे व त्याला प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देणे,नियोजित वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस व दिवा चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्या मिळत नसल्याने यापुर्वीही परळ येथील प्रा.मधू दंडवते जन्मशताब्दी उत्सव व सावंतवाडी रोड स्टेशन येथील टर्मिनससाठी केलेले उपोषणातून समितीने मोठे शक्ती प्रदर्शन केलेले आहे,यासाठी ही एल्गार सभा खूप महत्वाची आहे.
गणेशउत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण,याला मुंबईतून लाखो चाकरमनी कोकणातील आपल्या गावी जातात, त्यासाठी त्यांना पुरेशा कोकण रेल्वेच्या रेल्वे मिळवून देण्यासाठी ही सभा समस्त कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाची असल्याचे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले.
कित्येकदा कोकण रेल्वेमार्गावरून गणेशउत्सवासाठी सोडलेल्या जादा गणपती स्पेशल एक्सप्रेसचे तिकीट बुकींग पहिल्या तीन मिनीटामध्येच फुल होते,याच्याने खरा लाभार्थी असलेला कोकणी माणूस तिकीटापासून वंचितच राहतो,चाकरमन्यांचा रेल्वे प्रशासनाला प्रश्न आहे की,रेल्वेच्या दलालांचे बुकींग कसे होते?मग सर्वसामान्य कोकणी माणसाला गणपतीचे तिकीट का मिळत नाही?
लोकसभेची निवडणूक समोर ठेवून कोकणातील अनेक नेत्यांनी समितीला आश्वासने दिली होती त्याचे पुढे काय झाले? यासाठी ही एल्गार सभा निर्णायक ठरणार आहे,अन्यथा विधानसभेची निवडणूक फक्त पुढील तीनच महिन्यांवर आलेली आहे.
समितीच्या ह्या एल्गार सभेला मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,मिरा भाईदर,वसई विरार,बोईसर पालघर,भांडूप,ठाणे दिवा,कल्याण डोंबीवली,बदलापूर परिसरातील कोकण वासियांनी मोठया संस्थेने सहभागी व्हावे असे आवाहन सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी केले आहे.
Vision Abroad