२१ जुलै दिनविशेष – 21 July in History

जागतिक दिवस:
  • Invite An Alien To Live With You Day
  • Lowest Recorded Temperature Day
  • Take A Monkey To Lunch Day
महत्त्वाच्या घटना:
  • ३५६: ३५६ इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
  • १८३१: बेल्जिअमचा पहिला राजा लिओपॉल्ड याचा शपथविधी झाला.
  • १८७९: क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना इंग्रजांनी अटक केली
  • १८८३: कोलकाता येथे पहिल्या नाट्यगृहाची स्थापना
  • १८८४: लॉर्डस मैदानात पहिले क्रिकेट टेस्ट मॅच: सेंट जॉन्सवूड यांनी लंडनमध्ये लॉर्डस मैदानाचा शोध लावला. त्यामुळेच या मैदानाचे नाव लॉर्डस ठेवण्यात आले. या लॉर्डस मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला.
  • १८८८: स्कॉटिश शोधकर्ता आणि पशुवैद्यकीय सर्जन जॉन बॉयड डनलॉप(John Boyd Dunlop) यांनी रबराचे टायर आणि ट्यूब तयार करून परिवहन करण्यास गती निर्माण करून दिली.
  • १९४४: २० जुलै १९४४ रोजी अ‍ॅडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्‍न करणाऱ्या क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्गला फाशी देण्यात आले.
  • १९५४: पहिले इंडोचिनी युद्ध – जिनिव्हा परिषदेने व्हिओतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले. 21 जुलै 1954 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या एका परिषदेत इंडोचीनची फाळणी करण्याचे ठरले.
  • १९६०: सिरीमाओ बंदरनायके या श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान होत.
  • १९६२: भारत चीन सीमावाद – भारत-चीन युद्ध
  • १९६३: कशी विद्यापीठाला विश्वविद्यालयाचा दर्जा मिळाला.
  • १९७६: आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या
  • १९८३: अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील आत्तापर्यंतच्या सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली.
  • २००२: जगभर दूरसंचार सेवा पुरवणार्‍या ’वर्ल्ड कॉम’ या अमेरिकन कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
  • २००७: प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या: 21 जुलै 2007 रोजी प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.
  • २०१८: भारतामधील सॅनिटरी उत्पादनावरील टॅक्स सरकारने होत असलेल्या विरोधानंतर मागे घेतला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१६: ब्रिटीश वर्तमानपत्र समूह राईटर चे संस्थापक ज्युलियस राईटर (Julius Writer)यांचा जन्मदिन.
  • १८५३: शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद, पाश्चिमात्य व पौर्वात्य जोतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक (मृत्यू: २७ एप्रिल १८९८)
  • १८९९: अर्नेस्ट हेमिंग्वे – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक (मृत्यू: २ जुलै १९६१)
  • १९१०: वि. स. पागे – स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी कार्यकर्ते, संत वाङ्‍मयाचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १६ मार्च १९९०)
  • १९११: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान उमाशंकर जोशी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९८८)
  • १९२०: आनंद बक्षी – गीतकार (मृत्यू: ३० मार्च २००२)
  • १९३०: डॉ. रा. चिं. ढेरे – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक
  • १९३४: चंदू बोर्डे – भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष – पद्म भूषण, पद्मश्री, अर्जुना पुरस्कार
  • १९४५: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू बॅरी रिचर्ड्स यांचा जन्म.
  • १९४७: चेतन चौहान – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य
  • १९५१: अमेरिकन हास्य अभिनेते रॉबिन विलियम्स (Robin Williams) यांचा जन्मदिन.
  • १९६०: पंजाबी गायक अमरसिंग चमकीला यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८८)
  • १९६८: आदित्य श्रीवास्तव – भारतीय अभिनेते
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०६: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रथम अध्यक्ष व राजकारणी उमेशचंद्र बनर्जी यांचे निधन.
  • १९७२: जिग्मे दोरजी वांगचुक – भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९)
  • १९९४: डॉ. र. वि. हेरवाडकर – इतिहास संशोधक, वाङ्‌मय समीक्षक, मराठी बखर वाङ्‌मयाचे व्यासंगी अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • १९९५: सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७ – सीतामहू, मंदसौर, मध्य प्रदेश)
  • १९९७: राजा राजवाडे – साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६). राजा राजवाडे यांनी अनेक कांदबऱ्या, कथासंग्रह, कविता संग्रह, ललित गद्य लिहिले आहेत. तसेच त्यांनी सलग 35 वर्षे 18 नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं आहे.
  • १९९८: अमेरिकन अंतराळवीर ऍलन शेपर्ड यांचे निधन.
  • २००१: विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन – दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: १ आक्टोबर १९२८)
  • २००२: मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे निधन.
  • २००९: गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: ५ मार्च १९१३)
  • २०१३: भारतीय मार्शल आर्टिस्ट लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९८१)

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search