Konkan Railway Merger: कोंकण रेल्वे महामंडळाचे KRCL चे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी काल रायगड मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केली. काल केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना त्यांनी ही मागणी केली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ही एक स्वायत्त संस्था असून तिची स्थापना कोकण मार्गाचे बांधकाम कारण्याच्या हेतूने झाली होती. कोकण रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर तो भारतीय रेल्वेच्या एखाद्या विभागाला हस्तांतरण करणे गरजेचे होते. मात्र २५ वर्षे झाली तरीही तो हस्तांतरित झाला नाही. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गाच्या विकासावर झाला. कोकण रेल्वेचे स्थापना होवून 25 वर्षे झाली तरीही पाहिजे तसा विकास तिचा झाला नाही. KRCL आपल्या पूर्ण क्षमतेने विकास करण्याचा प्रयत्न करत असले तरीही त्यावर निधीअभावी मर्यादा येत आहेत. गेल्या २५ वर्षात प्रवासी संख्या कितीतरी पटीने वाढूनही त्या प्रमाणात गाड्या आणि सुविधा वाढल्या नाहीत. मुख्य म्हणजे कोकण गाड्या वाढविण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करणे खूप गरजेचे असूनही निधी मिळत नसल्याने अजूनही झाले नाही. अर्थसंकल्पातही कोकण रेल्वेसाठी कोणतीही तरतूद होत नाही. यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी जोर धरू लागली होती.
दिलासादायक गोष्ट म्हणजे आता रेल्वे संघटनेनंसोबत आता लोकप्रतिनिधींनीही याबाबत आवाज उठवायला सुरवात केली आहे. हल्लीच दक्षिणेकडील राज्यातील लोकप्रतिनिधींनी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची मागणी केली होती. आता खासदार सुनील तटकरे यांनी प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहचवून सुरवात केली असून लवकरच प्रवाशांना कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन झाल्याची गोड बातमी मिळेल अशी खात्री आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad