Konkan ExpressWay: कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तळकोकणातील इको सेन्सिटिव्ह झोन मूळे बळवली-पत्रादेवी या बहुप्रतिक्षित ग्रीनफिल्ड महामार्गाचे संरेखनात बदल करण्यात आला आहे. आवश्यक सुधारणांनंतर या महामार्गाचे अंतिम संरेख मंजूर करण्यात आले आहे. कोकणात होणार हा एक मोठा प्रकल्प असून त्यात मोठ्या संख्येने पूल आणि बोगदे असतील. आता मंजूर केलेल्या संरेखननुसार ५१ – वायडक्ट्स, ४१ टनेल , २१ मोठे पूल:, ४९ लहान पूल, ३ ROB:, १४ इंटरचेंज, ८ वेससाइड सुविधा या मार्गावर असतील
एक्सप्रेसवे संरेखन ४ पॅकेजमध्ये विभागले गेले आहे आणि पेणजवळ आगामी विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरपासून सुरू होईल आणि गोवा सीमेवर पत्रादेवी येथे समाप्त होईल.
1) एकूण ३८८.४५ किमी लांबीच्या या महामार्गाचे चार टप्प्यांत काम करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला टप्पा पेण, बळवली गाव (शहाबाज) ते रायगड जिल्ह्यातील म्हासळा तालुक्यातील विचारेवाडी असा ९६.०८ किमीचा असणार आहे.


2) या महामार्गाचा दुसरा टप्पा रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पडवे गाव ते गुहागर तालुक्यातील पाट पन्हाळे असा ६८.६२ किमीचा असेल.


3) तिसऱ्या टप्प्यात गुहागर तालुक्यातील पाट पन्हाळे ते राजापूर तालुक्यातील सागवे असा १२२.८१ किमी लांबीचा महामार्ग बांधण्यात येणार आहे.



4) शेवटचा म्हणजे चौथा टप्पा हा १००.८४ किमीचा असणार असून तो राजापूर तालुक्यातील वाडकर पोई ते सावंतवाडी तालुक्यातील क्षेत्रपळ (महाराष्ट्र आणि गोवा सीमा) असा असणार आहे.


Pics credit: INIOFFICIAL
Facebook Comments Box