सिंधुदुर्ग, दि. २९ जुलै: कोकणात समस्त कोकणकरांचे हक्काचे रेल्वे टर्मिनस असावे असे स्वप्न असणार्या कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनस संबधी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनससाठी लागणाऱ्या पाण्यासाठी रत्नसिंधू योजनेतून ४ कोटी तर जल जीवन मिशन अंतर्गत १.५ कोटी मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच त्यांच्याकडून टर्मिनस बिल्डिंग आणि पर्यटन हॉटेल साठी निधीची तरतूद केली गेली आहे.
सावंतवाडी टर्मिनसच्या लढ्याला यश मिळण्यास सुरवात
सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले होते. दीपक केसरकर यांच्या या घोषणेवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अलीकडेच संघटनेतर्फे राबवलेल्या सावंतवाडीच्या ईमेल मोहिमेला आणि ईतर स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळण्यास सुरवात झाली असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलेत.
Facebook Comments Box
😄First provide sheds on platform. Give prferance in jobs/ service to Sawantwadi residents, konkani peoples.