Konkan Railway Merging: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे ही मागणी अलीकडे जोर धरू लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील खासदार सुनील तटकरे यांनी ही मागणी संसदेत केली होती. आता उडुपी चिक्कमगलुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीचे निवदेन त्यांना दिले आहे.
उडुपी चिक्कमगलुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
कोकण विभागातील रेल्वे रुळांची सुधारणा, रेक बदलणे आणि रेल्वे स्थानके सुधारण्यासाठी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. मागे मंगळुरूच्या दौऱ्यात पुजारी इतर दोन खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा आणि विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी रेल्वेमंत्री राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांना या संदर्भातील निवेदन दिले होते.
याबरोबरच त्यांनी या भेटीत मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी ट्रेनसाठी नवीन एलएचबी कोचची गरज असल्याचे रेल्वेमंत्र्यांना सांगून लवकरात लवकर हा बदल करावा अशीही विनंती केली आहे. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये कारवार ते बेंगळुरू दरम्यान पडिल मार्गे नवीन ट्रेन जी उडुपी, कुंदापुरा आणि कारवारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रात्रभर ट्रेन सेवेची गरज भागवेल तसेच कुंदापुरा येथे एर्नाकुलम-निजामुद्दीन ट्रेनला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश आहे.
श्री. वैष्णव यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून आणि विलीनीकरणाबाबत कर्नाटक सरकारकडून अहवाल मागणार असल्याचे श्री. पुजारी यांनी सांगितले.
Facebook Comments Box
Vision Abroad