Changes in Ganpati special trains: गणपती उत्सवासाठी सोडण्यात आलेल्या काही विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विशेष गाड्यांना या स्थानकांवर थांबे न दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती व या स्थानकांवर थांबे देण्यात यावे अशी मागणी केली गेली होती. सुबक गणेशमूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण स्थानकावर गणपती विशेष गाड्यांना थांबा न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावे लागेल. दुसरीकडे फक्त एका नियमित गाडीला थांबा असलेल्या झाराप स्थानकावर किमान विशेष गाड्यांना तरी थांबे मिळावेत अशी मागणी झाली आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांना येथे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११८५/०११८६ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)- कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे
गाडी क्रमांक ०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे
गाडी क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल या विशेष गाडीला झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे खालील दोन विशेष गाड्यांच्या सेवेच्या कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत.
गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी आणि गाडी क्र. ०११६८ कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या दोन्ही गाड्यांचा कालावधी ०२/०९/२०२४ ते १९/०९/२०२४ असा सुधारित करण्यात आला आहे. याआधी तो ०१/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ असा होता.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Vision Abroad