Konkan Railway News: भारतीय रेल्वेने अलीकडे सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करण्यास सुरु केला असून त्यांच्यासाठी काही हिताचे निर्णय घेत आहे. जनरल डब्यांत होणारी गर्दी विचारात घेऊन रेल्वेने काही गर्दीच्या मार्गावरील इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
1) गाडी क्रमांक ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (T) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (T) एक्सप्रेस
सध्याची रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०६, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या दोन स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक ०१ डिसेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
2) गाडी क्रमांक. २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, जनरल – ०३ जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०४, जनरेटर कार – ०१ आणि एसएलआर – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे, टू टियर एसीचा एक डबा वाढविण्यात आला आहे. तर थ्री टियर एसीचा एक डबा कमी करण्यात आला आहे. दिनांक ३० नोव्हेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल
Facebook Comments Box
Vision Abroad