सिंधुदुर्ग, दि.०३ ऑगस्ट; जिल्ह्यातील मूर्तिकलेला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे.सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत यावर्षी मूर्तिकारांना मूर्तिकाम व्यवसायाकरिता ७५% अनुदान अथवा कमल ५०,००० रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेच्या ग्रामपंचात विभागाने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना लाभार्थ्यांची यादी दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत बनवून ती १२ ऑगस्ट २०२४ पर्यंत संबंधित जिल्हापरिषद कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
मूर्तिकला टिकवून ठेवण्यासाठी मूर्तिकारांना अनुदान जाहीर करण्याची मागणी होत होती. शाडू माती, रंग आणि मजुरीचे वाढलेले दरामुळे मूर्तिकलेवर विपरीत परिणाम होत होता. या निर्णयाने जिल्हयातील मूर्ती व्यवसायीकांना दिलासा मिळणार आहे. हा लाभ मिळवण्यासाठी दिनांक १० ऑगस्ट २०२४ पर्यंत गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्जात नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक ही माहिती भरून ग्रामपंचातीचा ना हरकत दाखला,गणेश मूर्तिकार व्यवसाय करत असल्याचे ग्रामपंचातीचे प्रमाणपत्र, ज्या जागेत व्यवसाय करत आहे त्या जागेचा घरपत्रक उतारा, गणेशमूर्ती बनवत असल्याचा फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. अर्जाचा नमुना या बातमीच्या खाली दिला आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad