



Senior citizens lower birth quota:भारतीय रेल्वे कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी लोअर बर्थ आणि साईड लोअर बर्थ आता राखीव ठेवणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांना रेल्वे प्रवासात मधील Middle किंवा वरचा Upper बर्थ खूपच गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लोअर बर्थ राखीव ठेवावे याची मागणी वाढत होती. या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी सर्व सर्व शयनयान श्रेणींच्या डब्यांचे लोअर बर्थ आणि साईड लोअर बर्थ आता राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्लीपर क्लासमध्ये ६ ते ७ लोअर बर्थ, थ्री टीयर एसी कोचमध्ये ४ ते ५ लोअर बर्थ आणि टू टीयर एसी कोचमध्ये ३ ते ४ लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी राखीव असतील. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.