Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मत्स्यगंधा एक्सप्रेसचे डबे कालबाह्य झाल्याने प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या गाडीचा जुना रेक बदलून ही गाडी नवीन एलएचबी LHB रेकसह चालविण्यात यावी अशी मागणी रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी इमेलद्वारे तसेच एक्स X च्या माध्यमातून रेल्वे प्रशासन तसेच संबधीत आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना केली आहे.
दिनांक ५ ऑगस्ट रोजी या गाडीतून प्रवास करणाऱ्या चिन्मय कोले नावाच्या प्रवाशाला प्रवासादरम्यान आलेल्या भयानक अनुभवाकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. ३ टायर एसी मधून प्रवास करणारे चिन्मय कोले चिपळूण स्थानकावर गाडी थांबल्याने बाहेर गेले होते, मात्र गाडीत परत चढत असताना दाराज्याजवळील छताचे सर्वच पत्रे खाली कोसळले, सुदैवाने ते थोडक्याच बचावले. मात्र ही घटना या गाडीतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना धोक्याची सूचना देऊन गेली. चिन्मय कोले यांनीही ही घटना विडिओसकट सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून प्रशासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गेली दैनिक स्वरूपात 25 वर्षे धावणाऱ्या मत्य्सगंधा एक्सप्रेसचे डबे आता कालबाह्य झाले आहेत. हेच डबे आता वापरणे चालू ठेवले तर एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर ही गाडी LHB डब्यांसह चालविण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. कर्नाटक राज्यातील लोकसभा खासदार कोटा श्रीनिवासा पुजारी यांनीही गेल्याच महिन्यात या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिले होते.
Facebook Comments Box