मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण आज करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे , आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या हप्त्याचं वितरण करण्यात आलं.
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी सुमारे एक कोटी २० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे २०४१ कोटी २५ लाख रुपये जमा करण्या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला होता.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जून २०२३ पासून राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या बरोबरीने नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेतून राज्य सरकारमार्फत आतापर्यंत तीन हप्त्यात पाच हजार ५१२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Related posts:
सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पटीने वाढणार; राज्यसरकारचा अजून एक मोठा निर्णय
महाराष्ट्र
फक्त २००० रुपयांत, तासाभरात कोकणात, पुणेकर चाकरमान्यांना अखेर मिळाला प्रवासाचा जलद पर्याय
महाराष्ट्र
रेल्वे प्रवासात खाद्यपदार्थ विकत घेत असाल तर हा विडिओ पहाच; खाद्यपदार्थ विक्रेत्यांचा प्रवाशांच्या आ...
महाराष्ट्र