Konkan Railway Updates: पाश्चिम उपनगरीय क्षेत्रातील कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक स्वतंत्र आणि नियमित गाडी असावी असे स्वप्न असलेल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मडगाव ते बांद्रा टर्मिनस अशी आठवड्यातून दोन दिवस धावणारी धावणारी नवीन रेल्वे गाडी लवकरच कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गाडीचा प्रस्ताव आणि कच्चा आराखडा कोकण रेल्वे तर्फे दिनांक २१ ऑगस्ट रोजी पाश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
या गाडीचा प्रस्तावित मार्ग बांद्रा – बोरिवली – वसई – रोहा – मडगाव असा नमूद करण्यात आला आहे. या गाडीला एकूण २० LHB स्वरूपाचे डबे असणार असून त्यात सेकंड स्लीपर/सीटींगचे ६ डबे, थ्री टायर एसी/थ्री टायर एसी इकॉनॉमीचे ५ डबे, टू टायर एसीचे २ डबे, जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, पँट्री कार – ०१, जनरेटर कार – ०१ समावेश आहे.
या प्रस्तावानुसार ही गाडी आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीचे थांबे अजून या प्रस्तावात नमूद केले नाही आहेत. मात्र गाडीचे सध्या दिलेले वेळापत्रक पाहता या गाडीला दिवा सावंतवाडी एक्सप्रेस 10105/10106 या गाडीच्या धर्तीवर थांबे मिळण्याची शक्यता आहे.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी गाडीचा हा कच्चा प्रस्ताव असून त्यात रेल्वेच्या तिन्ही विभागाच्या सूचनांची बदल होणार आहेत अशी माहिती दिली आहे. या गाडीची घोषणा लवकरात लवकर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
"कदाचित कोकणच्या नकाशात उद्या तुमचाही गाव नसेल; सुज्ञपणे मतदान करा.." - कोकणी रानमाणूस
कोकण
Konkan Railway: गणेशोत्सव विशेष गाड्यांच्या नियोजनात अनेक त्रुटी; रेल्वे प्रवासी समितीने वेधले लक्ष
कोकण रेल्वे
कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुपदरीकरण आणि इतर विषयांसाठी खासदार रवींद्र वायकर यांची रेल्वे मंत्र्यांशी ...
कोकण रेल्वे


