कणकवली: दरवर्षीप्रमाणे भाजप पक्षातर्फे चालविण्यात येणारी मोदी एक्सप्रेस यावर्षीही चालविण्यात येणार असल्याची माहिती कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांनी आज दिली. दिनाक ०४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईवरून ही गाडी कोकणसाठी रवाना होणार आहे. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी दिनांक २८, २९ आणि ३० ऑगस्ट भारतीय जनता पक्षाच्या देवगड, कणकवली आणि वैभववाडी मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी चाकरमान्यांना केले आहे.
भाजपतर्फे तळकोकणतील जनतेचा विचार नाही?
भाजपतर्फे सोडण्यात येणारी ‘भाजप एक्सप्रेस’ कुडाळपर्यंत चालविण्यात येते. तर ‘मोदी एक्सप्रेस’ फक्त कणकवली मतदारसंघातील चाकरमान्यांसाठी मर्यादित असते. या दोन्ही गाड्या तळकोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील प्रवाशांसाठी नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad