मालवण: सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जाऊन तोडफोड केल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त बनलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात शिरून तोडफोड केली होती.
राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते. आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vision Abroad