



सावंतवाडी: आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी बस कर्मचार्यांनी संप पुकारून ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांना वेठीस धरले आहे. सावंतवाडी आगार आज पूर्ण बंद असून तिथून एकही बस सुटली नसल्याने शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे आणि गावाकडे येणार्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि शहर यातील अंतर जास्त असल्याने एसटी बस चा सोयीचा पर्याय बंद असल्याने आज येथे येणार्या चाकरमान्यांना घरी पोहोचण्यासाठी मोठा आर्थिक फटका बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसेस नसल्याने आज शाळेत पोहोचू शकले नाहीत. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थी सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. राज्य शासनाने हा संप लवकरात लवकर मिटवून एसटी बसेस चालू कराव्यात अशी मागणी होत आहे