Konkan Railway Update: कोकणात यावर्षी गणेश चतुर्थीला गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पनवेल ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणार असून तिचा तपशील खालील प्रमाणे.
गाडी क्र. ०१४२८ / ०१४२७ मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्रमांक ०१४२८ दिनांक १५/०९/.२०२४ रोजी मडगाव जंक्शन येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल.ती त्याच दिवशी रात्री २२:१५ वाजता पनवेल येथे पोहचेल.
गाडी क्रमांक ०१४२७ दिनांक १५/०९/.२०२४ रोजी पनवेल जंक्शन येथून रात्री २२.४५ वाजता सुटेल.ती दुसऱ्या दिवशी दिवशी सकाळी ११.०० वाजता मडगाव येथे पोहचेल.
या गाडीचे थांबे: गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव येथे थांबेल. रोहा आणि पेण
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ डबे, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
Facebook Comments Box
Vision Abroad