Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन बोगद्यापैकी एका बोगद्याअंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे.
या महामार्गावरील एक बोगदा या आधीच एका वर्षांपूर्वी पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. एक वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत झाला तरीही माणगाव, इंदापूर, कोलाड या दरम्यान महामार्गावरील अपूर्ण असलेल्या कामामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही वाहतूककोंडी, मोकळी केली होती. पाच दिवसांचे गौरी-गणपती विसर्जन आणि अनंत चतुर्दशा झाल्यानंतर परतीचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने राष्ट्रीय बाधकाम विभाग आणि स्थानिक वाहतूक पोलिस यांनी योग्य नियोजन केले होते.
त्यामुळे या परिसरात कुठेही वाहतूककोंडी झालेली नाही. गौरी- गणपती विसर्जन आटपून परतणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूककोंडींचा फारसा फटका बसला नाही. कशेडी घाटाला पर्याय असलेल्या दोन्ही बोगद्यातील खवरदारीचा उपाय म्हणून बांधकाम खात्याने विशेष काळजी घेतली. दोन्ही बोगद्यातून प्रवास करताना वाहनांचा वेग कमी ठेवण्यात आला होता. दोन्ही बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे कशेडी घाटातून येण्याचा चाकरमान्यांचा वेळ वाचला आहे.
कशेडी येथील दुसऱ्या बोगद्यातील कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण २० सप्टेंबरपासून कार्यवाही करण्यात येणार आहे कामे पूर्ण करण्यासाठी पुढील एक ते दीड महिन्यासाठी बंद ठेवण्यात येईल अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad