मुंबई: नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भुज आणि अहमदाबादला जोडणाऱ्या देशातील पहिल्या ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ ला हिरवा कंदील दाखविला आहे. ही गाडी सर्वच बाबतीत मुंबईतील एसी लोकलच्या बाबतीत सरस आहे. मात्र प्रवास भाड्याचा विचार केला तर मुंबई एसी लोकलचे प्रवास भाडे ‘नमो भारत रॅपिड रेल्वे’ च्या जवळपास दुप्पट आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे अनेक सुविधांच्या बाबतीत मुंबई एसी लोकल च्या पुढे आहे. या गाडीचा वेळ प्रति तास १३० किमी आहे. तर गाडीत मोबाईल चार्जिंग, एलईडी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्हीची देखरेख, अद्ययावत अग्निशमन यंत्रणा आणि आरामदायक आसन व्यवस्थेत ही गाडी मुंबई एसी लोकलला मागे टाकत आहे. तर प्रवास भाड्याच्या बाबतीत मुंबई एसी लोकल पुढे आहे. उदाहरण द्यायचे झाले तर मुबईतील एसी लोकल चे चर्चगेट ते विरार सिंगल प्रवास भाडे ११५ रुपये आहे, आणि महिन्याच्या पासचे शुल्क २२०५ रुपये आहे. तेवढ्याच अंतरासाठी (५९ किलोमीटर) नमो भारत रॅपिड रेल्वेचे प्रवासभाडे अनुक्रमे ७० आणि १४१६ रुपये एवढे आहे.
याचा अर्थ मुंबईकरांना तुलनेने कमी सुविधा मिळणाऱ्या प्रवासासाठी जवळपास दुप्पट प्रवास भाडे भरावे लागत आहे. यामुळे मुंबईकर प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नमो भारत रॅपिड रेल्वे ही छोट्या छोट्या शहरांना जोडणार असल्याने तिचे प्रवासभाडे तेथील प्रवाशांना परवडणारे असणे आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हे भाडे ठरविण्यात आले आहे. मुंबईतील लोकल गाड्यांच्या प्रवास भाड्यात MUTP शुल्क आणि इतर शुल्कांचा समावेश असल्याने तिकीटदर तुलनात्मक दृष्टीने जास्त असतात असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
येत्या काही महिन्यांत मुंबई मध्ये वसई – दिवा, पनवेल – डहाणू/वसई, मुंबई – पुणे, मुंबई – नाशिक हे मार्ग नमो भारत रॅपिड रेल्वे साठी प्रस्तावित आहेत.
Facebook Comments Box
कारण नमो भारत ट्रेन अहमदाबाद ला चालू केली आहे मुंबई ला केली असती तर मुंबई तील लोकांना पण लुटलं असते
मुंबई मध्ये ए सि ला चढायला भेटत नाही त्या ट्रेन मुळे लोकल गाड्यामध्ये गर्दी वाढत चाली आहे गाड्या उशिरा चालत आहेत