IMD Alert: गेले दोन दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी धो-धो पावस पडत आहे. यामुळे अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसानही केले आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच आज दिनांक २५ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई आणि कोकण पट्ट्यात हवामान खात्याने धोक्याचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मंगळवारी (24 सप्टें.) गुजरा, राजस्थानच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून बाहेर पडला आहे. परतीच्या मान्सूनची सीमा फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट अबु, दिसा, सुरेंद्रनगर, जुनागढ येथून जात आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मीती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 27 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.
Vision Abroad