Wild Dog in Konkan: लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात काही गावांमध्ये कोळसुद्यांचे अस्तित्व दिसू लागले आहे. कोळसुंदे म्हणजे रानकुत्रा, कोळशिंदे, कोळसुंदे, कोळीसनं, कोळसून, सोनकुत्रा, देवाचा कुत्रा आणि अशा बर्याचशा स्थानिक नावांनी ओळखला जाणारा, कळपाने राहणारा हा मांसभक्षी जंगली कुत्रा.
कोळसुंद्यांचे अस्तित्व दिसू लागल्याने रानडुक्करांपासून भातशेतीचे होणारे नुकसानीचे प्रमाण कमी झाले आहे. तळवडे,येरवंडे, आसगे आदी गावात रानकुत्रे दिसत आहेत. यामुळे शेतीचे नुकसानकरणारे माकड, रानडुक्करांचे प्रमाण कमी झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणजे आहे. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यामध्ये वावरणार्या रानकुत्र्यांचे आता कोकणातील गावागावांमध्ये होणारे दर्शन आता चर्चेचा विषय बनत
आहे.
लोकांमध्ये या प्राण्याविषयी बरेच समज आहेत. हे प्राणी आपले मूत्र शेपटीच्या साहाय्याने भक्ष्याच्या डोळ्यात उडवून त्यांना आंधळ करतात, असा गैरसमज कोकणातील काही गावांमधील शिकार्यांमध्ये आजही रूढ आहे. अर्थात असेच गैरसमज आणि भीतीमुळे शिकारी आणि स्थानिकांच्या मनात रानकुत्र्यांबद्दल भीतीयुक्त आदराची भावना असल्याचे दिसून येते. मात्र कोकणात शेतीला नुकसानदायी ठरणार्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत असताना त्यांच्या वाढत्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी रानकुत्र्यांची संख्यादेखील वाढणे आवश्यक असल्याचे मत वन्यजीव संशोधक मंडळी मांडत आहेत.
सह्याद्रीमध्ये रानकुत्र्यांचे प्रमुख अन्न सांबर, भेकर यांसारखे हरीण कुळातील प्राणी आहेत. याशिवाय ससे आणि रानडुक्करांसारख्या प्राण्यांचीदेखील ते शिकार करतात. तसेच गायी, म्हशींचीदेखील शिकार करत असल्याच्या नोंदी काही गावांमधूनआहेत. सद्यःपरिस्थितीत रानडुक्कर आणि सांबर या प्राण्यांमुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत. रानडुकरांकडून शेतीचे आणि सांबराकडून आंबा-काजूसारख्या बागायती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाव आणि शेतीनजीक या तृणभक्षी प्राण्यांची संख्यादेखील वाढलेली आहे, अशा परिस्थितीत या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम हे रानकुत्रे करत आहेत. त्यामुळे शेती आणि पिकांची नासाडी टाळायची असेल, तर संरक्षित वनक्षेत्राबाहेर फिरणार्या रानकुत्र्यांच्या कळपांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad