सिंधुदुर्ग: जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आठ वाघांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच विक्रमी ८ वाघांची नोंद झाली आहे. यात तीन नर आणि पाच मादींचा समावेश आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत हे वाघ टिपण्यात आले आहेत.
सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून जनावरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढू लागले होते. त्यामुळे हे हल्ले वाघाकडूनच होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. तसेच काही ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना दिसले.
सिंधुदुर्ग वनविभाग तसेच सह्याद्री टायगर रिझर्व्ह, फॉरेस्ट डब्लू सी टी ही स्वयंसेवी संस्था अशा तिघांनी मिळून जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यात सावंतवाडी पासून दोडामार्ग तालुक्यातील जंगलात तब्बल आठ वाघ आढळून आले. एवढे मोठ्याप्रमाणात वाघ दिसण्याचे सिंधुदुर्ग च्या इतिहासात प्रथमच घडले आहे.कारण २०१४ च्या जनगणेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्य वर आली होती मात्र आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.विशेष म्हणजे यात तीन नर व पाच मादीचा समावेश आहे.
Vision Abroad