



Mumbai Local: पाश्चिम उपनगरीय मार्गावरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पाश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकल गाड्यांचे वेळापत्रक दिनांक 12 ऑक्टोबर पासून बदलण्यात आले आहे.
नवीन वेळापत्रकात १२ नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर ६ लोकल सेवांचा विस्तार करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने नवीन वेळापत्रकात अप दिशेने सहा आणि डाउन दिशेने सहा लोकल सेवांचा समावेश केला आहे.
अप दिशेने बोरिवली – चर्चगेट जलद लोकल बोरिवलीहून सकाळी १०.३६ वाजता चालविण्यात येत होती. ती लोकल आता भाईंदरहून सकाळी १०.२१ वाजता सुटेल आणि चर्चगेटला सकाळी ११.२४ वाजता पोहोचेल. विरार – अंधेरी जलद लोकल दादरपर्यंत विस्तारित केली आहे. ही गाडी विरारहून दुपारी ३.३६ वाजता सुटेल आणि दुपारी ४.४१ वाजता दादरला पोहोचेल. तर वसई रोड – चर्चगेट जलद लोकल विरारहून चालविण्यात येणार आहे. वसई रोडवरून रात्री ८.४१ वाजता सुटणारी चर्चगेट जलद वातानुकूलित लोकल आता विरारहून रात्री ८.२९ वाजता सुटेल आणि रात्री ९.५३ वाजता चर्चगेटला पोचणार आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार पश्चिम रेल्वेने १२ डब्यांच्या १० जलद लोकलला १५ डब्यांत रूपांतरित केले आहे. अप मार्गावर १०.३९ वाजताची विरार – चर्चगेट, १०.४४ ची विरार – दादर लोकल, दुपारी १.१४ वाजता सुटणारी विरार – अंधेरी, दुपारी १.४२ वाजता सुटणारी विरार – चर्चगेट, दुपारी २.४८ वाजता सुटणारी विरार – बोरिवली या लोकल १५ डब्बा चालविण्यात येणार आहेत. तर डाउन दिशेने दुपारी १२.६ वाजता सुटणारी दादर – विरार लोकल, दुपारी १२.०९ वाजताची चर्चगेट – विरार, दुपारी २ वाजताची अंधेरी – विरार, दुपारी ३. १८ वाजता सुटणारी चर्चगेट – विरार, दुपारी ३. २३ वाजता सुटणारी बोरिवली – विरार जलद लोकल १५ डब्याची चालविण्यात येणार आहे.
नवीन १२ लोकल कोणत्या?
अप दिशेने सकाळी ५.३२ वाजता अंधेरी – चर्चगेट धीमी लोकल, सकाळी ७ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी १०.२५ वाजताची डहाणू रोड – विरार धीमी लोकल, सकाळी ११.३५ ची जलद विरार – चर्चगेट लोकल, दुपारी २. २८ ची गोरेगाव – चर्चगेट धीमी लोकल आणि रात्री ९.५८ वाजता बोरिवली – चर्चगेट धीमी लोकल चालविण्यात येणार आहे. तर डाऊन दिशेने सकाळी ४.५० वाजता विरार – डहाणू रोड दरम्यान धीमी लोकल, सकाळी ९.०७ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, ९.३० वाजता विरार – डहाणू रोड धीमी लोकल, दुपारी २. २३ वाजता चर्चगेट – गोरेगाव धीमी लोकल, रात्री ९.२७ वाजता चर्चगेट – अंधेरी धीमी लोकल, रात्री १०. ५ वाजता चर्चगेट – नालासोपारा जलद लोकल चालविण्यात येणार आहे.
बदललेले वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक क्लिक करा.
अप लोकल
https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545484440-UP-AC-78-PTT-W.E.F.-12.10.2024.pdf
डाऊन लोकल
https://kokanai.in/wp-content/uploads/2024/10/1728545420850-DN-AC-PTT-78-W.E.F.-12.10.2024.pdf