आजचे पंचांग
- तिथी-कृष्ण चतुर्थी
- नक्षत्र-कृतिका
- करण-बावा
- पक्ष-कृष्ण-पक्ष
- योग-दुपारी 02:11:04 पर्यंत व्यातिपात
- दिवस-रविवार
- सूर्योदय – 06:34:06 AM
- सूर्यास्त – संध्याकाळी 06:11:29
दिनविशेष
जागतिक दिवस:
- लोकशक्ती दिन
- जागतिक अस्थिसुषिरता (Osteoporosis) दिन
महत्त्वाच्या घटना:
- १५६८: साली मुघल शासक अकबर यांनी चित्तोडगढ वर हल्ला केला.
- १७७४: साली कोलकाता(तत्कालीन कलकत्ता) ही भारताची राजधानी बनली होती.
- १८२२: साली ब्रिटीश वर्तमानपत्र ‘लंडन संडे टाईम्स‘ चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता.
- १९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
- १९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
- १९६२: चीनने भारतावर आक्रमण केले. लडाख आणि ईशान्य भारतात (नेफा) चीनचे सैन्य घुसले आणि त्यांनी भारतीय ठाणी काबीज केली.
- १९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना
- १९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर
- १९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
- १९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
- १९५०: कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.
- १९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.
- १९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
- १९९५: ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर
- २००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर
- २०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८५५: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)
- १८९१: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २४ जुलै १९७४)
- १८९३: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)
- १९१६: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)
- १९२०: साली भारतीय कायदेपंडित, मुत्सद्दी आणि पश्चिम बंगालमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंजाब राज्याचे माजी राज्यपाल व अमेरिकेचे भारतीय राजदूत अशी अष्टपैलू कामगिरी सांभाळणारे सिद्धार्थ शंकर राय यांचा जन्मदिन.
- १९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)
- १९३०: साली भारताची राजधानी दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचा जन्मदिन.
- १९६३: नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
- १९७८: वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८९०: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म: १९ मार्च १८२१)
- १९८२: भारतीय वरिष्ठ नागरी सेवक अधिकारी तसचं, केरळ आणि मध्य प्रदेश राज्यांचे राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचे निधन.
- १९६१: व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली. (जन्म: ? ? ????)
- १९६४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० ऑगस्ट १८७४)
- १९७४: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (जन्म: २० जानेवारी १८९८)
- १९८४: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)
- १९९६: दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
- १९९९: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: ? ? १९१५)
- २००९: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म: ४ मे १९२९)
- २०१०: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म: ५ जानेवारी १९४८)
- २०११: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म: ७ जून १९४२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box