नवी दिल्ली: भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित Retired कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे.
६५ वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक आणि ट्रॅक पुरुष यासारख्या भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. मुदतवाढीच्या पर्यायासह नियुक्त्या दोन वर्षांसाठी राहतील. सर्व रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक या सेवानिवृत्तांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती Fitness आणि गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या रेटिंगच्या आधारे नियुक्त करू शकतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांना निवृत्त होताना असलेले वेतन दिले जाणार आहे मात्र त्यातून त्यांचे मूळ पेन्शन वजा केले जाईल. त्यांना प्रवासासाठी आणि अधिकृत टूरसाठी प्रवास भत्ते देखील मिळतील परंतु अतिरिक्त लाभ किंवा पगार वाढीसाठी ते पात्र नसतील.
वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागात Zones एकूण २५००० कर्मचारी भरती करण्याचे उद्दिष्ट आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad