२१ ऑक्टोबर दिनविशेष – 21 October in History

आजचे पंचांग 
  • तिथि-पंचमी – 26:31:19 पर्यंत
  • नक्षत्र-रोहिणी – 06:50:29 पर्यंत, मृगशिरा – 29:51:08 पर्यंत
  • करण-कौलव – 15:19:31 पर्यंत, तैतुल – 26:31:19 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-वरियान – 11:09:57 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय-06:34:42
  • सूर्यास्त-18:11:06

दिनविशेष
महत्वाच्या घटना
  • १२९६: अल्लाउद्दिन खिलजी हे दिल्ली येथील शासक बनले.
  • १८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
  • १८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
  • १८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
  • १९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.
  • १९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना
  • १९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • १९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
  • १९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
  • १९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.
  • १९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
  • १९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • १९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर
  • २००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
  • २०१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतील आपत्ती प्रतिसाद कार्यात सहभागी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८३०: हिमालय भागाचा शोध लावणारे पहिले भारतीय व्यक्ती नैन सिंह रावत यांचा जन्मदिन.
  • १८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)
  • १८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)
  • १९१७: राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)
  • १९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले. चार वेद, सहा शास्त्रे, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावर १९७ ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मभास्कर’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मऋषी’ या पदव्या मिळाल्या होत्या.
  • १९३१: शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)
  • १९३८: प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि नर्तक हेलन यांचा जन्मदिन.
  • १९४०: एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू
  • १९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९वे पंतप्रधान

 

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)
  • १८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५)
  • १९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)
  • १९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)
  • १९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५)
  • २०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
  • २०१२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search