रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी एसटी ने प्रवास मोफत केला आहे. मात्र या वयोगटातील प्रवाश्यांची संख्या कमी आहे. शारीरीक अडचणीमुळे जेष्ठ नागरीकांना बस मध्ये चढणे, उतरणे कठीण जाते. तसेच त्यांना एस टी ने प्रवास करण्यास कुटुंबही नकार देतात. या स्थितीत ६५ वर्षापासुन वयोगटांतील जेष्ठ नागरीकांनाही मोफत प्रवासाचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.
आर्थिक अडचणीमुळे अनेक जेष्ठ नागरीकांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करता येत नाही. या समस्येचा सारासार विचार करून शासनाने या वयोगटातील नागरीकांनाही मोफत प्रवास योजनेत सहभागी करुन घ्यावे, तसेच या मागणीचे समर्थन पावस विभागातील काही सामाजिकक संस्थानीही केले असुन ६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीकांना मोफत एस टी प्रवासाची सुविधा मिळावी व शासनाने जेष्ठ नागरीकांच्या प्रवास सोईकडे विशेष लक्ष घालावे, असे संतोष पोकडे यांनी सांगितले.
Vision Abroad