२३ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि- सप्तमी – 25:21:36 पर्यंत
  • नक्षत्र- पुनर्वसु – 30:16:28 पर्यंत
  • करण- विष्टि – 13:20:05 पर्यंत, भाव – 25:21:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- शिव – 06:58:02 पर्यंत, सिद्ध – 29:50:58 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:35:25
  • सूर्यास्त-18:09:50

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
  • १७६४: मुघल शासक मीर कासीम यांचा बक्सरच्या लढाईत पराभव झाला.
  • १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
  • १८९०: हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)
  • १९१०: अमेरिकेतील ब्लांश एस. स्कॉट या महिला मदती शिवाय एकट्या विमान उडविणाऱ्या पहिल्या वैमानिक बनल्या.
  • १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
  • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
  • १९४३: नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी  सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या अंतर्गत महिलांची ‘झाशीची राणी ब्रिगेड’ सेनेची स्थापना केली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
  • १९४६: न्यूयॉर्क येथे सयुक्त राष्ट्राची पहिली महासभा पार पडली.
  • १९४७: गेर्टी कोरी आणि त्यांचे पती कार्ल कोरी हे पहिले असे दांपत्य होते ज्यांना चिकित्सक क्षेत्रातील नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.
  • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
  • १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
  • १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
  • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
  • १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
  • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
  • २००४: जपान येथे आलेल्या भूकंपामुळे सुमारे ८५ हजार नागरिक बेघर झाले होते.
  • २०१९: भारतीय वायू दलाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
  • १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
  • १७७८: चन्नम्मा – कित्तूरची राणी (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)
  • १८७९: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)
  • १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
  • १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
  • १८९८: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व केंद्रीय कामगार मंत्री तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल खंडूभाई देसाई यांचा जन्मदिन.
  • १९००: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: १८ जून १९५८)
  • १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)
  • १९२३: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
  • १९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)
  • १९२४: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)
  • १९२५: भारतीय राज्य राजस्थान चे माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी अकरावे उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचा जन्मदिन.
  • १९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
  • १९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)
  • १९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
  • १९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.
  • १९४५: शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६)
  • १९५७: प्रख्यात भारतीय उद्योगपती, समाजसेवक आणि भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांचा जन्मदिन.
  • १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
  • १९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.
  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.
  • १९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९१०: चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)
  • १९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)
  • १९२१: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
  • १९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)
  • १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)
  • १९६२: भारतीय सर्वोच्च सैन्य शौर्य पुरस्कार परमवीर चक्र सन्मानित प्रख्यात भारतीय लष्कर सैनिक सुभेदार जोगिंदर सिंह यांचे निधन.
  • १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
  • १९७३: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ब्रिटीश भारतीय क्रांतिकारक महिला तसचं, कलकत्ता येथील ४७ व्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा नेली सेनगुप्त यांचे निधन.
  • १९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
  • १९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
  • १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.
  • २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
  • २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
  • २०१२: सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search