Bandra Terminus : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील आज पहाटे गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच यातील दोण जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ९ प्रवासी जखमी झाले आहेत. वांद्रे – गोरखपूर ही गाडी पूर्णपणे अनारक्षित डब्यांची चालविण्यात येते. सामान्यपणे ही गाडी दोन तास अगओड्र प्लॅटफॉर्म वर लागते मात्र आज या गाडीला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे रेल्वे आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वेत चढण्यासाठी मोठी गर्दी केली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली.
वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केलेले बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तर प्रदेशात आपल्या गावी जात होते, अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. यावर अद्याप रेल्वे प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सध्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म परिस्थिती व्यवस्थित असून प्लॅटफॉर्मवर पोलीस उपस्थित असल्याची माहिती देण्यात येत आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Local: पुन्हा पुन्हा तिकीट काढायची गरज नाही; मुंबई लोकलचं 'हे' तिकीट काढा आणि दिवसभर फिरा
महाराष्ट्र
Rain Alert: कोकण आणि पश्चिम महाराष्टात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस - हवामान खात्याचा इशारा
कोकण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी येणार? – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यां...
महाराष्ट्र
Vision Abroad