Konkan Railway News: कोकणरेल्वे मार्गावर सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात गाडयांचा कमी केलेला वेग आज दिनांक ०१ नोव्हेंबरपासून पूर्वपदावर येणार आहे. आजपासून कोकण रेल्वे आपल्या बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे. मात्र या वेळापत्रकात कोकण रेल्वेने काहीसा बदल केला आहे. काही गाड्यांच्या रेल्वे स्थानकावरील आगमन आण निर्गमन वेळात बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गाडी क्रमांक २२११६ करमाळी – एलटीटी एक्सप्रेसच्या कणकवली स्थानकावरील आगमनाच्या वेळेत बदल करून ती रात्री १६:३२ करण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ १६:२० अशी होती.
गाडी क्रमांक १२७४१ वास्को दि गामा-पटना एक्सप्रेसच्या रत्नागिरी या स्थानकावरील आगमनाच्या वेळेत बदल करून ती रात्री ००:३५ करण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ ००:५० अशी होती.
गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव एक्सप्रेसच्या आडवली या स्थानकावरील आगमनाच्या वेळेत बदल करून ती १४:०३ करण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ १४:०६अशी होती.
गाडी क्रमांक १२६१९ एलटीटी -मंगुळुरु ‘मत्स्यगंधा’ एक्सप्रेसच्या चिपळूण या स्थानकावरील आगमनाच्या वेळेत बदल करून ती १९:४० करण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ १९:४६ अशी होती.
गाडी क्रमांक १९२६० भावनगर – कोचुवेली एक्सप्रेसच्या माणगाव या स्थानकावरील आगमनाच्या वेळेत बदल करून ती ०१:३५ करण्यात आली आहे. यापूर्वी ही वेळ ०१:२४ अशी होती.
Facebook Comments Box
Related posts:
कोकणच्या मातीचा गंध असलेली, सावंतवाडीच्या सुपुत्राने बनवलेली वेबसीरीज ‘संभ्रम’ बुधवारी ओटीटी प्लॅटफॉ...
कोकण
Konkan Railway: मत्स्यगंधा एक्सप्रेसचा अपघात होता होता टळला; लोको पायलटने दाखवलेल्या समयसूचकतेचे कौत...
अपघात
कोकणकरांनो ही संधी गमावू नका, कोकणरेल्वेत विविध पदांसाठी मोठी भरती, भूमिपुत्रांना प्राधान्य मिळणार
कोकण रेल्वे