आजचे पंचांग
-
तिथि-द्वितीया – 22:07:31 पर्यंत
-
नक्षत्र-अनुराधा – पूर्ण रात्र पर्यंत
-
करण-बालव – 09:18:44 पर्यंत, कौलव – 22:07:31 पर्यंत
-
पक्ष-शुक्ल
-
योग-सौभाग्य – 11:38:37 पर्यंत
-
वार-रविवार
-
सूर्योदय- 06:42
-
सूर्यास्त- 18:02
-
चन्द्र राशि- वृश्चिक
-
चंद्रोदय- 08:03:00
-
चंद्रास्त-19:11:59
-
ऋतु- हेमंत
दिनविशेष
जागतिक दिवस:
- पनामा, डॉमिनिका व मायक्रोनेशियाचा स्वातंत्र्यदिन
- संस्कृती दिन – जपान
महत्त्वाच्या घटना:
- १८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
- १९३८: पाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.
- १९०३: पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.
- १९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.
- १९१३: अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.
- १९१८: पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
- १९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
- १९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
- १९५७: रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली ’लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
- १९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
- २०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १६८८: सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
- १९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)
- १९०१: पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २९ मे १९७२)
- १९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)
- १९२१: चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
- १९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.
- १९३३: अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
- १९३७: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २५ मे १९९८)
- १९५४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८१९: अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी (जन्म: ? ? १७४४)
- १८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)
- १९९०: मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
- १९९२: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
- १९९८: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जानेवारी १९२०)
- १९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)
- २०००: प्रा. गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
- २०१२: कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल (जन्म: ५ आक्टोबर १९२३)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad