९ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-अष्टमी – 22:47:22 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 11:48:21 पर्यंत
  • करण-विष्टि – 11:27:09 पर्यंत, भाव – 22:47:22 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-वृद्वि – 28:22:37 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:45
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र-राशि-मकर – 23:28:22 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:18:00
  • चंद्रास्त- 24:49:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १५८०: स्पेन या देशाच्या सेनेने आयर्लंड देशावर आक्रमण केले होते.
  • १७९४: तत्कालीन रशियाच्या सेनेने पोलंडची राजधानी वारसा ताब्यात घेतली होती.
  • १९०६: आपल्या कार्यकालात देशाबाहेर जाणारे थिओडोर रुझव्हेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी पनामा कालव्याला भेट दिली.
  • १९२३: दिनचर्या नावाचे एक पत्र दतात्रय गणेशजी यांनी पुण्यात सुरु केले.
  • १९३७: जपानी सैन्याने चीनमधील शांघाय शहराचा ताबा घेतला.
  • १९४७: भारत सरकारने जूनागढ संस्थान बरखास्त करुन ताब्यात घेतले.
  • १९४९: कोस्टारिका या देशाने संविधानाचा अंगीकार केला होता.
  • १९५३: कंबोडियाला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
  • १९५४: दार्जीलिंग या थंड हवेच्या ठिकाणी हिमालय पर्वतारोहण संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
  • १९६०: रॉबर्ट मॅकनामारा हे फोर्ड मोटर कंपनीचे अध्यक्ष बनले. ’फोर्ड’ आडनाव नसणारे ते पहिलेच अध्यक्ष होते. मात्र जॉन केनेडी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यामुळे एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.
  • १९६५: इलेक्ट्रिसिटी ग्रिड खराब झाल्याने न्यूयॉर्क शहरासह पूर्व अमेरिकेतील बर्‍याच भागाचा वीजपुरवठा १२ तास खंडित झाला.
  • १९६७: रोलिंग स्टोन मासिकांचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १९८८: मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या शुद्धीकरण संकुलातील दुर्घटना, भीषण आगीत १२ जण मृत्युमुखी.
  • १९८९: ब्रिटनने मृत्यू दंडाच्या शिक्षेवर पूर्णपणे बंदी घातली होती.
  • १९९७: साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा जनस्थान पुरस्कार प्रदान
  • २०००: उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • २०००: न्यूयॉर्क येथे झालेल्या एका लिलावात पाब्लो पिकासोचे एक चित्र पाच कोटी छप्पन्न लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्रासाठी मिळालेली ही विक्रमी किंमत आहे.
  • २०००: उत्तराखंड राज्याची निर्मिती.
  • २००१: पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आजच्याच दिवशी संयुक्त राष्ट्र या जागतिक संस्थेच्या महासभेला संबोधित केले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४८३: मार्टिन ल्युथर यांचा जन्म झाला होता.
  • १८०१: आटवलेल्या दुधाचे शोधक गेल बोर्डन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १८७४)
  • १८६७: जैन तत्त्वज्ञानी, विद्वान, कवी श्रीमद राजचंद्र यांचा जन्म. (मृत्यू: ९ एप्रिल १९०१)
  • १८७७: सारे जहाँन से अच्छा चे पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते कवी मोहम्मद इक़्बाल यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)
  • १८७७: सर मुहम्मद इक्‍बाल – पाकिस्तानी कवी, तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते (मृत्यू: २१ एप्रिल १९३८)
  • १८८९: प्रसिध्द भारतीय पत्रकार इंद्र विद्यावाचस्पती यांचा जन्म झाला होता.
  • १९०४: पंचानन माहेश्वरी – सपुष्प वनस्पतींतील पुनरुत्पादन क्रियेसंबंधी संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: १८ मे १९६६)
  • १९१८: तायक्वोंडो मार्शल आर्ट चे निर्माते चोई हाँग हाय यांचा जन्म. (मृत्यू: १५ जून २००२)
  • १९२४: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (मृत्यू: १० जानेवारी २००२)
  • १९३१: एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)
  • १९३४: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (मृत्यू: २० डिसेंबर १९९६- सिअ‍ॅटल, वॉशिंग्टन, यु. एस. ए.)
  • १९३६: प्रसिध्द हिंदी कवी सुदाम पांडे यांचा जन्म झाला होता.
  • १९४४: भारतीय कोरिओग्राफर चितेश दास यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१५)
  • १९८०: पायल रोहतगी – अभिनेत्री व मॉडेल.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९२२: फ्रांस येथील प्रसिध्द विदुषक रेमंड डेवोस यांचा जन्म झाला होता.
  • १९४०: नेव्हिल चेंबरलेन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १८ मार्च १८६९)
  • १९४१: संस्कृत भाषेचे पंडित व विद्वान गंगानाथ झा यांचे निधन झाले होते.
  • १९५२: चेम वाइझमॅन – इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ नोव्हेंबर १८७४)
  • १९६२: महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न (जन्म: १८ एप्रिल १८५८)
  • १९६७: नटवर्य बाबूराव पेंढारकर (जन्म: ? ? १८९७)
  • १९७०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (जन्म: २२ नोव्हेंबर १८९०)
  • १९७७: केशवराव भोळे – गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक. ’अमृतमंथन’, ’संत तुकाराम’, ’ कुंकू’, ’माझा मुलगा’,’ संत ज्ञानेश्वर’, ’संत सखू’ आदी बोलपटांतील गीतांच्या स्वररचना आणि संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. ’एकलव्य’ या टोपणनावाने त्यांनी ’वसुंधरा’ या साप्ताहिकात अभिजात गायक-गायिकांविषयीचे लेख लिहिले. क्रिकेटवरही ते अभ्यासपूर्ण लेखन करत असत. (जन्म: २३ मे १८९६)
  • २०००: मिस वर्ल्ड स्पर्धेचे निर्माते एरिक मॉर्ले यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९१८)
  • २००३: मैथिली भाषेतील लेखक व कवी विनोद बिहारी वर्मा यांचे निधन.
  • २००५: फ्रांस या देशात आजच्याच दिवशी आणीबाणी घोषित करण्यात आली होती.
  • २००५: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (जन्म: २७ आक्टोबर १९२०)
  • २०११: हर गोविंद खुराना – जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ९ जानेवारी १९२२)
  • २०१३: प्रसिध्द राजस्थानी साहित्यकार विजयदान देथा यांचे निधन झाले होते.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search