Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक १२१३३/१२१३४ सीएसएमटी – मंगुळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस ही गाडी दिनांक ०१ मार्च २०२५ पासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२१३३ सीएसएमटी – मंगुळुरु एक्सप्रेस दिनांक ०१ मार्च २०२५ च्या फेरीपासून तर गाडी क्रमांक १२१३४ मंगुळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस दिनांक ०३ मार्च २०२५ च्या फेरीपासून एलएचबी कोचसहित चालवण्यात येणार आहे. आतापर्यंत ही गाडी १७ डब्यांची धावत होती मात्र या गाडीचा एक सेकंड स्लीपर डबा करून ती १६ एलएचबी डब्यांची करण्यात आलेली आहे.
डब्यांच्या संरचनेत मोठा बदल
या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल केला असून या गाडीच्या २ स्लीपर कोचेसचे जनरल डब्यांत करण्यात आले आहे. त्यामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या आता ४ झाली आहे तर स्लीपर कोचेसची संख्या ७ वरुन ५ करण्यात आली आहे. थ्री टायर एसी डब्यांची संख्या ४ वरून ३ तर टू टायर एसी डब्यांची संख्या १ वरून २ करण्यात आली आहे.
![]()
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway: अवजड वाहनांना प्रतिबंध घालण्यासाठी कशेडी घाटात मजबूत हाईट खांबाची पुन्हा उभारणी
कोकण
Mumbai-Goa Bus Accident: मुंबई गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; तीन ते चार प्रवाशांचा मृत्यू ...
महाराष्ट्र
बोरिवली - सावंतवाडी गाडीचे थांबे निश्चित करताना 'या' बाबींचा विचार करण्यात यावा - कोकण विकास समिती
कोकण


