ICC Champions Trophy 2025 :चॅम्पियन्स ट्रॉफीचे संभाव्य वेळापत्रक समोर आले आहे. पाकिस्तानने आयसीसीला पाठवलेल्या ड्राफ्ट वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लाहोरमध्ये होणार आहे. पण टीम इंडिया कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयने आयसीसीला स्पष्ट केले आहे. आता या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने भारताच्या हायब्रिड मॉडेलच्या ऑफरवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून उत्तर मागितले आहे. खरंतर, बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास भारत सरकारने नकार दिल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्यानंतर भारतीय संघ पाकिस्तानात जाणे जवळपास अशक्य झाले आहे.
पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर टीम इंडियाने तिथे न गेलेलेच बरे आहे. मात्र, पाकिस्तान भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी सातत्याने विनंती करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलमध्ये आयोजित करण्याबाबत भारताने आयसीसीशी चर्चा केल्याचे वृत्त आहे, आयसीसीने याबाबत पीसीबीकडून उत्तर मागितले आहे.
पण आता मोठा ट्विस्ट आला आहे. पाकिस्तानने भारताची हायब्रीड मॉडेलची ऑफर स्वीकारली नाही तर संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाऊ शकते, असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. जर पाकिस्तानने भारताची विनंती मान्य केली आणि ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. तर टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळेल. असे अनेक अहवालांमध्ये म्हटले आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की भारत समोर आणि पाकिस्तान हरला आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad