आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 13:03:25 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 27:11:41 पर्यंत
- करण-बालव – 13:03:25 पर्यंत, कौलव – 23:25:45 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-वज्र – 15:24:39 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:47
- सूर्यास्त- 17:59
- चन्द्र-राशि-मीन – 27:11:41 पर्यंत
- चंद्रोदय- 15:56:59
- चंद्रास्त- 28:48:59
- ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
- १८४१: जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या आकर्षणामुळे संमोहन विषयावर अभ्यास करण्याला प्रोत्साहन मिळाले.
- १८६४: ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले जाते.
- १९१३: रविंद्रनाथ टागोर यांच्या ’गीतांजली’ला नोबेल पारितोषिक
- १९२१: वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
- १९३१: शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
- १९४७: सोव्हिएत युनियनने एके ४७ बंदुक तयार केली.
- १९६८: पाकिस्तान मध्ये आजच्या दिवशी झुल्फिकार अली भुट्टो यांना अटक करण्यात आली होती.
- १९७०: बांगला देशात आलेल्या भयानक चक्रीवादळात एका रात्रीत सुमारे ५,००,००० लोक मृत्यूमुखी पडले. ही विसाव्या शतकातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती होती.
- १९७१: अमेरीकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे पाठविलेले यान मरिनर -९ आजच्या दिवशी मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचले होते.
- १९७५: जागतिक आरोग्य संघटनेने आजच्याच दिवशी आशिया खंडातून देवी या रोगाचा समूळ नायनाट झाल्याची घोषणा केली होती.
- १९९४: स्वीडनमधे घेतलेल्या सार्वमतात जनतेने युरोपियन समुदायात सामील होण्याचा निर्णय घेतला.
- १९९७: सुरक्षा परिषदेने इराक या देशावर यात्रेवर निर्बंध लावले होते.
- १९९८: चीन च्या विरोधाला झुगारून आजच्याच दिवशी दलाई लामा व तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती बील क्लिंटन यांनी एकमेकांची भेट घेतली होती.
- २००४: तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आजच्याच दिवशी फिलीस्तीन देशाच्या निर्मितीकरिता चार वर्षांचा कार्यकाल ठरविला होता.
- २००८: ‘असम गणपरीषद ‘ संघटन आजच्याच दिवशी राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन नावाच्या पक्षात समाविष्ट झाले होते.
- २००९: झारखंड या राज्यात आजच्याच दिवशी नक्सलवादी संघटनेने नेते रामचंद्र सिंह यांच्या समवेत ईतर सात लोकांचे अपहरण केले होते.
- २०१२: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७८०: महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (मृत्यू: २७ जून १८३९)
- १८५०: आर. एल. स्टीव्हनसन – इंग्लिश लेखक व कवी (मृत्यू: ३ डिसेंबर १८९४)
- १८५५: गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (मृत्यू: १४ जून १९१६)
- १८७३: बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू (मृत्यू: १० मार्च १९५९)
- १८९८: इस्कंदर मिर्झा – पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६९)
- १९१७: गजानन माधव मुक्तिबोध – हिन्दी कवी, लेखक, टीकाकार व संपादक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६४)
- १९१७: वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (मृत्यू: १ मार्च १९८९)
- १९५४: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक स्कॉट मॅकनीली यांचा जन्म.
- १९६७: प्रसिध्द भारतीय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
- १९६८: हिंदी चित्रपट सृष्टी तील प्रसिध्द अभिनेत्री जुही चावला हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १५८९: लाहोर या ठिकाणी भगवान दास यांचे निधन झाले होते.
- १७४०: कृष्णदयार्णव – प्राचीन मराठी कवी. त्यांचा ’हरिवरदा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. (जन्म: ? ? १६७४)
- १९५६: इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (जन्म: १ नोव्हेंबर १८९३ – मेखलीगंज, कुच बिहार, पश्चिम बंगाल))
- २००१: अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी – ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्या लेखिका. ’दुर्दैवाशी दोन हात’ या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. (जन्म: १५ ऑगस्ट १९१७)
- २००२: ऋषिकेश साहा – नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते (जन्म: ? ? १९२५)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad