१४ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-त्रयोदशी – 09:45:26 पर्यंत, चतुर्दशी – 30:21:14 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 24:33:29 पर्यंत
  • करण-तैतिल – 09:45:26 पर्यंत, गर – 20:03:32 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-सिद्वि – 11:29:20 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:48
  • सूर्यास्त- 17:59
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 16:40:00
  • चंद्रास्त- 29:53:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • बाल दिन (भारत)
महत्त्वाच्या घटना:
  • १६८१: आजच्याच दिवशी ईस्ट कंपनीने बंगाल ला वेगळे प्रांत बनविण्याची घोषणा केली होती.
  • १७७०: जेम्स ब्रूस यांनी नाईल नदीचा स्रोत शोधला.
  • १९२२: ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनीने युनायटेड किंग्डम मध्ये रेडिओ सेवेची सुरूवात केली.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने इंग्लंडमधील कॉव्हेंट्री शहरावर जोरदार बॉम्बहल्ला केला.
  • १९६९: जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाची (JNU) स्थापना
  • १९७१: मरीनर – ९ या अंतराळयानाने मंगळाच्या कक्षेत प्रवेश केला.
  • ???? : दर वर्षी या दिवशी नेहरू पुरस्कार देण्यात येतात.
  • १९७३: आजच्याच दिवशी ब्रिटेन राजघराण्यातील राजकुमारी ‘ऐन’ ने इतिहासत प्रथमच एका सामान्य व्यक्तीशी विवाह केला होता, तत्पूर्वी असे कधीही घडले न्हवते.
  • १९७५: स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.
  • १९९१: जर्मनीचे चॅन्सेलर डॉ. हेल्मुट कोल यांची १९९० च्या जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • २००२: तत्कालीन चीनचे राष्ट्रपती जियांग जेमिन यांनी आपल्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता.
  • २००६: भारत – पाकिस्तान या दोन्ही देशांतील विदेश सचिवांनी आजच्याच दिवशी दिल्ली येथे बैठकीत आतंकवाद विरोधी कार्यपध्दती विकसित करण्याचे धोरण ठरविले.
  • २००७: डेन्मार्क या देशाचे पंतप्रधान आंद्रे फाग यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
  • २०१३: सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतला शेवटचा (२०० वा) कसोटी सामना खेळण्यास सुरुवात केली. वेस्ट ईंडीजविरुद्ध हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे खेळण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६५०: विल्यम (तिसरा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ८ मार्च १७०२)
  • १७६५: रॉबर्ट फुल्टन – अमेरिकन अभियंते व संशोधक, वाफेच्या शक्तीवर चालणारी जहाजे त्यांनी शोधल्यामूळे शिडाच्या जहाजांचे युग संपुष्टात आले. पाणतीराचा (torpedo) शोधही त्यांनीच लावला. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १८१५ – न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
  • १७१९: लिओपोल्ड मोत्झार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार व व्हायोलिनवादक आणि जगप्रसिद्ध वूल्फगँग मोत्झार्टचे वडील (मृत्यू: २८ मे १७८७)
  • १८६३: लिओ हेन्ड्रिक आर्थर बेकेलँड – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, १९०९ मधे त्यांनी लाखेवर अनेक प्रयोग करुन ’बॅकेलाईट’ नावाचा पदार्थ तयार केला. ही प्लॅस्टिक युगाची सुरुवात मानली जाते. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९४४ – बेकन, डचेस, न्यूयॉर्क, यू. एस. ए.)
  • १८८१: पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी यांचा जन्म. (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)
  • १८८९: पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्‍न [१९५५] (मृत्यू: २७ मे १९६४)
  • १८९१: बिरबल सहानी – पुरावनस्पती शास्त्रज्ञ, राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष (मृत्यू: १० एप्रिल १९४९ – पुणे)
  • १९०४: हेरॉल्ड लारवूड – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २२ जुलै १९९५)
  • १९०७: हिंदी भाषेचे प्रसिध्द भारतीय साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांचा जन्म झाला होता.
  • १९१७: प्रसिध्द हिंदी साहित्यकार गजानन मुक्तिबोध यांचा जन्म झाला होता.
  • १९१८: रघुवीर मूळगावकर – चित्रकार (मृत्यू: ३० मार्च १९७६)
  • १९१९: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (मृत्यू: २६ आक्टोबर १९९१)
  • १९२२: ब्यूट्रोस ब्यूट्रोस घाली – संयुक्त राष्ट्रांचे ६ वे सरचिटणीस
  • १९२२: अमेरिकेची अभिनेत्री वेरोनिका लेक हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९२४: रोहिणी भाटे – कथ्थक नर्तिका (मृत्यू: १० आक्टोबर २००८)
  • १९२६: उदारवादी धोरणाचे पुरस्कर्ते व मुक्त आर्थिक व्यवहार नीतीचे खंदे समर्थक पिलू मोदी यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९३५: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९९९)
  • १९४७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक भारतन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९९८)
  • १९७१: अ‍ॅडॅम गिलख्रिस्ट – ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक व धडाकेबाज फलंदाज
  • १९७४: हृषिकेश कानिटकर – क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९१५: बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (जन्म: ५ एप्रिल १८५६)
  • १९६७: सी. के. नायडू – क्रिकेटपटू (जन्म: ३१ आक्टोबर १८९५)
  • १९७१: नारायण हरी आपटे – कादंबरीकार, चित्रपट कथालेखक. ’सुखाचा मूलमंत्र’, ’पहाटेपुर्वीचा काळोख’, ’उमज पडेल तर’, ’एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबर्‍या होत. ’कुंकू’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्या ’न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारलेला होता. (जन्म: ११ जुलै १८८९ – समडोळी, जिल्हा सांगली)
  • १९७७: अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक (जन्म: १ सप्टेंबर १८९६)
  • १९९३: डॉ. मणिभाई भीमभाई देसाई – स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींचे सच्‍चे अनुयायी, ग्रामीण विकासाचा पाया घालणारे सामाजिक कार्यकर्ते, दुधाचा महापूर योजनेचे एक शिल्पकार (जन्म: २७ एप्रिल १९२०)
  • २०००: प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी (जन्म: ५ नोव्हेंबर १९२९)
  • २०१०: भारताचे प्रसिध्द अर्थशास्त्री लक्ष्मीचंद जैन यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते.
  • २०१३: प्रसिध्द बाल साहित्यकार व संपादक हरिकृष्ण देवसरे यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
  • २०१५: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक के.ए. गोपालकृष्णन यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search