SSC & HSC Exam Schedule: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १० वी आणि १२ बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत असून पहिले सत्र सकाळी ११:०० ते दुपारी २:०० आणि दुसरे सत्र दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी २०२५ मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या २३ ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या. प्राप्त सूचनांवर विचार करून राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे.
बारावी लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
बारावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025
दहावी लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
दहावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
सीबीएसई परिक्षांचे वेळापत्रक जाहीर
सीबीएसईने आपली वेबसाईट cbse.gov.in वर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२५ चे वेळापत्रक जारी केले आहे. वेळपत्रकानुसार, दोन्ही परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु होतील. दहावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. तर १२ वीचा १५ फेब्रुवारीला एंटरप्रेन्योरशिपची परीक्षा असेल, तसेच १७ फेब्रुवारीला फिजिकल एज्युकेशनची परीक्षा असेल. तर ४ एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल.
Facebook Comments Box
Related posts:
IMD Rain Alert: विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा परतणार;राज्यातील 'या' जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा
महाराष्ट्र
IMD Alert | राज्यात पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता; 'या' जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा...
महाराष्ट्र
Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणू...
कोकण